More on this book
Community
Kindle Notes & Highlights
साधारणपणे सांगायचं तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनेत तीन मुस्लीम साम्राज्यं अस्तित्वात होती. अहमदनगर (महाराष्ट्र) राजधानी असलेली निजामशाही, विजापूर (कर्नाटक) राजधानी असलेली आदिलशाही आणि हैद्राबाद (तेलंगणा/आंध्र प्रदेश) राजधानी असलेली कुतुबशाही किंवा गोवळकोंडा.
आपण औरंगजेबाला समजून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही आणि म्हणून आपण कधी शिवाजी राजांनाही समजून घेऊ शकलो नाही. (संदर्भ: कुरुंदकर, २००३)
शिवाजी राजांना आठ पत्नी होत्या. त्यांची काही लग्नं ते अगदी लहान असतानाच झाली होती. त्यांच्या सर्व पत्नी या प्रतिष्ठित मराठा वतनदार घराण्यातल्या होत्या आणि त्यांची नावं होती सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवतीबाई. राजांना दोन मुलगे आणि सहा मुली होत्या. औरंगजेबाच्या चार पत्नी होत्या. दिलरस बानू (पर्शियन शिया मुस्लीम), नवाब बाई (कश्मिरी हिंदू, नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला), औरंगाबादी महल (मुस्लीम), उदेपुरी महल (ही दारा शुकोहची रखेल होती. काही जणांच्या मते ती जॉर्जीअन गुलाम स्त्री होती.) औरंगजेबाला चार मुलगे आणि पाच मुली होत्या.

