More on this book
Kindle Notes & Highlights
“आपला देश मुळात इतका दरिद्री आहे की माणसं फार थोड्या किंमतीत विकत घेता येतात.”
सरकारी नोकरीत माणूस लायक आहे की नाही ह्यापेक्षा तो नालायक आहे की नाही हे ठरवायला जास्त वेळ लागतो.
“नवरा जास्त हुशार असला की तिच्या अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्या की संघर्ष वाढला.
हुशार नवऱ्याला स्वतःची मतं असतात.
संसारात नवऱ्याने स्वतःचं मत सोडून बाकी सगळं बायकांना द्यावं ही त्यांची आपेक्षा असते.”
बदललेल्या काळाचे फटके सर्वांना बसत आहेत.
पानावर पंगतीतल्या ठरलेल्या पदार्थांत, जिलबीच्या जागी ऑम्लेट वाढलं तर काय वाटेल? काही काही असोसिएशन्स ठरलेल्या असतात. पुरणाची पोळी खायला काटा-चमचा दिला तर काय वाटेल?
“आपण आहोत हे असे आहोत. आणि आपल्याला त्याची खंत नाही. सालं आयुष्य इतकं झपाझप संपतंय, खंत करायला सवड आहे कुठे? एखादी व्यक्ती आवडली, जोडली. नाही पटली, तोडली.
आयुष्य इतकं छोटं आहे की, एक चूक दुसऱ्यांदा करायला पण सवड नाही इथं.”
कंटाळा ही अजबच चीज आहे. तो एकदा आला की दुसरं काही येत नाही. कोणत्या तरी कवितेत, कुणा तरी कवीने म्हटलं, ‘कंटाळ्याच्या दिवशी काय होतं- आधी कंटाळा येतो, मग कंटाळा येतो आणि मग कंटाळा येतो.’
एरवी मनस्ताप, चिंता, शारीरिक क्लेश, कष्ट ह्याच नाण्यांनी आपण जास्त व्यवहार करतो.
“प्रत्यक्षापेक्षा कल्पनाविश्व नेहमीच विराट असतं.”