Kindle Notes & Highlights
Read between
March 19 - March 20, 2022
पण रानांतून वाहणाऱ्या लहान लहान झऱ्यांचं पाणी स्वच्छ आणि गोड असतं. काही काही माणसंही तशीच असतात.
“प्रेम आंधळ असतं म्हणून तर ते आपल्या माणसाच्या घराची वाट चुकतं!”
संशयाइतका जलद वाढणारा दुसरा विषवृक्ष नाही जगात.
लहानसहान गोष्टीतच मनुष्याचं निम्मं सुख असतं, हे पुरुषापेक्षा बायकांना अधिक कळतं.
अग्निदिव्यातून शरीर सुखरूप बाहेर येतं; पण मन मात्र होरपळून निघतं. सीतेलासुद्धा हाच अनुभव आला होता. नाही का?

