पैसा आला की तुमच्यामधले गुण आणि अवगुण दोन्हीही बाहेर येतात. पैसा नसताना दडपलेले अवगुण पैसा आल्यावर बाहेर येतात. त्या अर्थी पैसा हा रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की लोभी होतो. तो आणखी-आणखी जमीनजुमल्याची खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी होतो. उदार माणूस दानी होतो. ज्यांना पैशाचा मोहच नाही, त्यांना पैसा आहे आणि नाही, यात काहीही फरक दिसत नाही. पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं.