More on this book
Kindle Notes & Highlights
माणसाला प्रेम हवं, पण त्याचं बंधन होऊन श्वास कोंडता कामा नये.
सत्य एक असलं, तर असत्य अनेक संख्येनं असतं. अंदाज तर हजारोंच्या संख्येनं असतात.
जिथं कायद्याची भाषा सुरू होते, तिथं नाती संपतात!”
अनुभव हा अत्यंत उत्तम गुरू आहे; पण तो अपार गुरुदक्षिणा मागतो!
माणसाच्या मनात धैर्य निर्माण करणारा तोच असतो आणि त्याचा पाय खेचणारा शत्रूही तोच असतो!
जग जिंकलेल्या अलेक्झांडरच्या समाधीवर एक चित्र आहे. त्याच्या एका हातात तलवार आहे आणि दुसरा हात रिकामा आहे. तो काय सांगतोय ठाऊक आहे? या तलवारीच्या साहाय्यानं मी जग जिंकलंय, पण या जगातून जाताना मी रिकाम्या हातीच जात आहे!….”
“या जगात भांडणाला प्रमुख कारण आहेत, ती म्हणजे कनक, कांता आणि भूमी!…
पैसा आला की तुमच्यामधले गुण आणि अवगुण दोन्हीही बाहेर येतात. पैसा नसताना दडपलेले अवगुण पैसा आल्यावर बाहेर येतात. त्या अर्थी पैसा हा रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की लोभी होतो. तो आणखी-आणखी जमीनजुमल्याची खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी होतो. उदार माणूस दानी होतो. ज्यांना पैशाचा मोहच नाही, त्यांना पैसा आहे आणि नाही, यात काहीही फरक दिसत नाही. पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं.