मुलं जेव्हा जास्तीत जास्त संकटात होती तेव्हा ती मित्राच्या घरी राह्यली. त्यांना आई-बापापेक्षा मित्र जवळचा वाटावा ह्यात आपला पराभव आहे. कोणत्याही प्रसंगी, कोणताही गुन्हा घडला तर मुलांनी आई-बापाजवळच जायला हवं. मुलांचा तेवढा विश्वास ज्यांना संपादन करता येत नाही त्यांनी आईबाप होण्यापूर्वीच फार विचार करायला हवा. आईबाप ह्याचा अर्थच क्षमा. मुलांचे अपराध पोटात घालता येत नसतील तर समाज आणि आईबाप ह्यांत फरक काय?’’