‘संसार यशस्वी कधी होतो ते सांगतो. संसारात सहा महिन्यांच्या मुलापासून माझ्यासारख्या साठीच्या घरातला म्हातारा असू शकतो. सहा महिन्यांच्या मुलाच्या गरजा निराळ्या असतात. तारुण्यानं बहरलेल्या जोडीदाराची मागणी काही निराळी असते. सासूची अपेक्षा तिच्या वयाप्रमाणे असते. तर एखादी बरोबरची नणंद वेगळ्या नजरेनं तुमच्याकडे बघत असते. त्याशिवाय आला गेला, पै- पाहुणा, ह्यांपैकी प्रत्येकाला तुमच्याकडून काही ना काहा हवं असतं. त्या त्या वयाच्या गरजांची टिंगलटवाळी किंवा उपेक्षा न करता त्या गरजा जी मुलगी पुऱ्या करते तिचा संसार दृष्ट लागण्यासारखा होतो.’’