समर्पक शब्दाचं नातं कायम दुसऱ्या माणसाशी असतं. तुम्ही जे सांगाल ते समोरच्या माणसाला तत्क्षणी पटायला हवं. तुम्ही शंभर टक्के सत्य सांगितलंत तरीही ऐकणाऱ्याला ते समर्पक वाटावं लागतं. तुम्हाला तीव्र वेदना देणारी गोष्ट दुसऱ्याला मामुली वाटणं, ही वेदनेपेक्षा जास्त चटके देणारी अवस्था असते. आणि त्याउलट कधीकधी तीव्र वेदनेपेक्षा एखादं सारवासारवीचं उत्तर ऐकणाऱ्याला फार स्पष्टीकरण न देता पटतं.