सखी [Sakhi]
Rate it:
Started reading September 28, 2023
21%
Flag icon
‘सावली देऊ शकणाऱ्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं.”
34%
Flag icon
अश्रू उधारीवर मागता येत नाहीत. सहानुभूतीच्या शब्दांनी मूळ दु:ख मिटत नाही आणि संघर्षाने प्रश्न सुटत नाहीत. सोसण्याचा वसा हा ज्याचा त्याचाच असतो आणि पुरुष धड पत्नीचा नसतो आणि आईचाही नसतो. तो स्वत:चाच, त्याचा असतो. तो वेळेचा विचार करतो. न्याय-अन्यायाचा नाही. ह्या क्षणी आपल्या सोयीचं काय आहे इतकंच तो पाहतो.
35%
Flag icon
‘‘टॅक्सी पसंत कशी करशील?’’ ‘‘ड्रायव्हर म्हातारा पाह्यजे आणि टायर्स तरुण.’’
36%
Flag icon
जेवढं पचेल तेवढं खायचं. भूक जबरदस्त असेल, किंवा वासना, तर दोन्ही मारायचं नाही, पचवायची ताकद वाढवायची.’’
37%
Flag icon
मुलं जेव्हा जास्तीत जास्त संकटात होती तेव्हा ती मित्राच्या घरी राह्यली. त्यांना आई-बापापेक्षा मित्र जवळचा वाटावा ह्यात आपला पराभव आहे. कोणत्याही प्रसंगी, कोणताही गुन्हा घडला तर मुलांनी आई-बापाजवळच जायला हवं. मुलांचा तेवढा विश्वास ज्यांना संपादन करता येत नाही त्यांनी आईबाप होण्यापूर्वीच फार विचार करायला हवा. आईबाप ह्याचा अर्थच क्षमा. मुलांचे अपराध पोटात घालता येत नसतील तर समाज आणि आईबाप ह्यांत फरक काय?’’
42%
Flag icon
‘संसार यशस्वी कधी होतो ते सांगतो. संसारात सहा महिन्यांच्या मुलापासून माझ्यासारख्या साठीच्या घरातला म्हातारा असू शकतो. सहा महिन्यांच्या मुलाच्या गरजा निराळ्या असतात. तारुण्यानं बहरलेल्या जोडीदाराची मागणी काही निराळी असते. सासूची अपेक्षा तिच्या वयाप्रमाणे असते. तर एखादी बरोबरची नणंद वेगळ्या नजरेनं तुमच्याकडे बघत असते. त्याशिवाय आला गेला, पै- पाहुणा, ह्यांपैकी प्रत्येकाला तुमच्याकडून काही ना काहा हवं असतं. त्या त्या वयाच्या गरजांची टिंगलटवाळी किंवा उपेक्षा न करता त्या गरजा जी मुलगी पुऱ्या करते तिचा संसार दृष्ट लागण्यासारखा होतो.’’
44%
Flag icon
समर्पक शब्दाचं नातं कायम दुसऱ्या माणसाशी असतं. तुम्ही जे सांगाल ते समोरच्या माणसाला तत्क्षणी पटायला हवं. तुम्ही शंभर टक्के सत्य सांगितलंत तरीही ऐकणाऱ्याला ते समर्पक वाटावं लागतं. तुम्हाला तीव्र वेदना देणारी गोष्ट दुसऱ्याला मामुली वाटणं, ही वेदनेपेक्षा जास्त चटके देणारी अवस्था असते. आणि त्याउलट कधीकधी तीव्र वेदनेपेक्षा एखादं सारवासारवीचं उत्तर ऐकणाऱ्याला फार स्पष्टीकरण न देता पटतं.
45%
Flag icon
आपण ‘अ‍ॅबिलिटी’ आहोत. तोपर्यंत स्वत:ला हवं ते आयुष्य जगू शकतो. ‘अ‍ॅबिलिटीची’ ‘लायबिलिटी’ झाली की आपण कसं जगायचं ते इतर ठरवायला लागतात.’’
49%
Flag icon
तर्क आणि बुद्धी ह्यांच्या इलाख्यात समोरचा माणूस गेला, की अंतर वाढत जातं.
61%
Flag icon
आपल्या स्वरात स्वर मिळवणारा मुलगा दुसऱ्या बाईच्या तालावर नाचणार हे समजलं की आईचं आईपण संपलं. ती ‘सासू’ होते.