फ्रेंच तत्त्वज्ञ वॉल्टेअरने असं निसंदिग्धपणे म्हटलं आहे, की भूमिती शिकण्यासाठी पायथागोरस गंगेच्या किनारी गेला होता. ‘हिस्ट्री ऑफ मॅथेमॅटिक्स’चा लेखक अब्राहम सिडेनबर्ग यानेही बॅबिलोनिया, इजिप्त किंवा ग्रीस येथील सर्वच प्राचीन गणितज्ज्ञांच्या गणिताचा स्त्रोत सुलभसूत्र असल्याचं म्हटलं आहे. फक्त पायथागोरसचा सिद्धांतच नव्हे; तर दशांश पद्धती, शून्याची आणि अपरिमित किंवा अनंत (इन्फिनिटी) ही संकल्पना या साऱ्या गोष्टी वैदिक विद्वानांनी निर्माण केल्या होत्या. आता आधुनिक संगणकांमध्ये सर्वसामान्यपणे सातत्यानं वापरली जाणारी बायनरी पद्धतीही वैदिक श्लोकांच्या आधारेच विकसित केली गेली होती!”