“सतवताच्या मुलाने स्थापन केलेला दुसरा वंश म्हणजे वृष्णी. सतवत हासुद्धा यदु वंशाचाच होता. प्रथम ते उत्तर भारतातील बरसना या भागात स्थायिक झाले आणि नंतर तिथून ठिकठिकाणी स्थलांतरित झाले. तिथे त्यांच्या कुटुंबीयांना विविध आडनावांनी ओळखलं जाऊ लागलं. वर्षने, वर्षनी, वर्षनया, वॉर्ष्ने, वर्ष्नी, वृष्णी, व्रिष्णी अशी विविध नावं मिळाली.