“झकेरिया म्हणतो, की या मंदिरात कित्येक मौल्यवान वस्तू अर्पण केल्या गेल्या होत्या. या मंदिराला सुमारे दहा हजार गावांतून देणग्या दिल्या जात होत्या. तिथून जवळच गंगा नावाची पवित्र मानली जाणारी नदी वाहते. सोमनाथापासून ती दोनशे परसंग अंतरावर आहे. सोमनाथासाठी रोज या नदीचं पाणी आणलं जातं आणि मंदिर धुवून काढलं जातं. एक हजार ब्राह्मण मंदिरातील मूर्तीची पूजा करतात आणि भक्तांची व्यवस्था बघतात. मंदिराच्या दरवाजासमोर पाचशे कुमारिका गायन आणि नृत्य करतात. मंदिराला मिळालेली निसर्गदत्त देणगी म्हणून या साऱ्याकडे पाहिलं जातं. एकूण ५६ सागवानी स्तंभांवर हे मंदिर उभारलं गेलं आहे. मूर्तीचा मुकुट काळसर आहे, मात्र तिला
...more