गांधारी आपल्या पुत्रांच्या मृत्यूचा शोक करत होती. त्या दु:खावेगात कौरव वंशाच्या सर्वनाशाबद्दल तिने कृष्णाला शाप दिला, की त्याचा स्वत:चा वंशही येत्या ३६ वर्षांनंतर नष्ट झालेला असेल. दंतकथेनुसार, छत्तीस वर्षांनंतर महापूर आला आणि द्वारका नगरीत घराघरांत पाणी शिरलं. कृष्णाने आपल्या यादववंशीयांना जहाजात बसवून उंचावर नेलं.