राजा मानसिंगाचा आग्ऱ्यातील राजवाडा त्यावेळी त्याचा नातू राजा जयसिंग याच्या ताब्यात होता. मुमताज महलच्या मृत्यूनंतर अर्जुमंद बानु बेगम उर्फ मुमताज उल् जमानी हिच्या दफनासाठी या राजवाड्याची निवड करण्यात आली. पूर्वजांकडून वंशपरंपरागत पद्धतीने चालत आलेली मालमत्ता म्हणून राजा मानसिंगाच्या कुटुंबीयांना या मालमत्तेचं मोठंच मोल वाटत होतं. तरीही शाहजहानसाठी त्यांनी या राजवाड्याचा काही भाग मोफत देण्यास मान्यता दिली.