इस्लामचा प्रसार होण्यापूर्वी काबा हे ख्रिस्ती नसलेल्या लोकांचं मंदिर होते, ही वस्तुस्थिती जग विसरून गेलं आहे. काबा येथे ३६० मूर्ती होत्या. वर्षातील प्रत्येक दिवशी त्यांच्यापैकी एकेका देवाची पूजा केली जात असे. चंद्रदेव हुबळ हा त्यांच्यापैकी प्रमुख देव होता. शिवाशी त्याचं साधर्म्य आहे. शिवाप्रमाणेच हुबळनेही मस्तकावर चंद्र धारण केला आहे. शिवाच्या पवित्र जटेतून गंगा वाहते, त्याप्रमाणेच हुबळच्या जटेतूनही झमझमचा प्रवाह बाहेर पडतो,” माताजी म्हणाल्या. “काबा येथील कित्येक विधी मुस्लिमांनी तसेच सुरू ठेवले होते. हिंदु लोक अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालतात, त्याप्रमाणे मुस्लीमही काबाभोवती सात प्रदक्षिणा
...more