“झकारिया म्हणतो, की सोमनाथ ही भारतातील वैभवशाली नगरी होती. या नगरीतील काही विस्मयजनक गोष्टींपैकी एक होतं सोमनाथ मंदिर. ते समुद्रकिनारी बांधण्यात आलं होतं आणि समुद्राच्या लाटा त्याच्या पायथ्याशी येऊन त्याला जलस्नान घालत असत. या मंदिराच्या मध्यभागी सोमनाथाची तरंगती मूर्ती होती. तिला खालून कोणताही आधार देण्यात आला नव्हता किंवा वरून कोणत्याही प्रकाराने तिला टांगण्यात आलं नव्हतं. हिंदुंच्या मनात या मंदिराविषयी आणि मूर्तीविषयी नितांत भक्तिभाव आणि आदर होता. ती तरंगती मूर्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत असे. मग ते मुसलमान असोत वा हिंदुतर कोणीही असोत! चंद्रग्रहणाच्या वेळी हिंदुंची येथे यात्रा भरते. या
...more