सुलतानानं आश्चर्यानं मूर्तीकडे पाहिलं आणि सर्वत्र सुरू असलेला विध्वंस थांबवण्याचे आदेश दिले. त्याने तेथील खजिना लुटण्यास सुरुवात केली. तिथे कित्येक सोन्या चांदीच्या मूर्ती आणि भांडी होती. या सर्व गोष्टी रत्नजडीत होत्या. भारतातील कित्येक महान व्यक्तींनी त्या तिकडे धाडल्या होत्या. मंदिरातील विविध मूर्तींच्या केलेल्या लुटीची किंमत वीस हजार दिनारांहूनही अधिक झाली होती. मूर्तीच्या वैभवशालीपणाविषयी आणि सौंदर्याविषयी त्यांना काय वाटतं, असं सुलतानानं आपल्या सैनिकांना विचारलं. कारण ती मूर्ती कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगत होती. त्यावेळी बहुतेकांना असं वाटलं, की तिला बहुधा गुप्तपणे कोणता तरी आधार दिला
...more