“तिबेटच्या रहिवाशांसाठी आणि बौद्धधर्मियांसाठी हा पर्वत हे डेमचोगचं निवासस्थान आहे. हिंदु लोक त्याला शिवाचं निवासस्थान मानतात. ऋषभदेव या मुनींना जिथे साक्षात्कार झाला आणि त्यांनी ज्ञानाचा प्रसार करण्यास सुरुवात केली ते हे स्थान आहे, असं जैन लोक मानतात.