“ही जपमाळा ग्रहमालेच्या मार्गाचे प्रतिनिधीत्व करते. सूर्य आणि चंद्र यांच्या आकाशातील मार्गांचे प्रतिनिधीत्व करते. या मार्गाचे योग्यांनी २७ समान भागांत विभाजन केले. त्यालाच नक्षत्रं असं म्हणतात. या प्रत्येक नक्षत्राच्या समान चार भागांना पद असं म्हणतात. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र यांची अवकाशातील १०८ स्थानं यामुळे निश्चित करण्यात आली आहेत,” माताजींनी स्पष्ट केले. “परंतु याहूनही १०८ या आकड्याचं आणखी वैशिष्ट्य काय आहे, हे तुला माहिती आहे का?” तारक त्यांच्याकडे अपेक्षेने पहात राहिला. त्याला त्याचे उत्तर मिळाले. “सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सूर्याच्या व्यासाच्या बरोबर १०८ पट आहे, ही खरी
...more