“इस्लामच्या आधीही अल्लाह हा शब्द अस्तित्वात होता. अल् हा आदरार्थी शब्द आहे. इंग्रजीतील ‘द’ प्रमाणे याचा अर्थ होतो आणि इलाह म्हणजे दैवत. कालौघात, अल् आणि इलाह हे दोन स्वतंत्र शब्द न राहता ते एकत्रितपणे उच्चारले जाऊ लागले. त्यामुळे त्याचा उच्चार अल्लाह असा झाला.”