More on this book
Kindle Notes & Highlights
वसंतबनात गाणाऱ्या कोकिळेला कुठं राजदरबारातल्या उच्च स्थानाची अपेक्षा असते?
जी शक्ती पैशांमध्ये आहे, ती कधीच गुणांमध्ये नसते. ज्यांच्याकडे पैसे नाही, तेच पैशाविषयी उपरोधानं बोलतात!
आपल्यापेक्षा गरीब माणसं भेटली की, हीच माणसं त्यांना हीन लेखतात आणि त्यांना अवमानानं वागवतात.
पैसा असेल तर माणसाला सूर्याचं स्थान मिळतं आणि नसेल तर श्वानाची अवस्था प्राप्त होते.
डॉलरच्या रुपानं धन कमावत असल्यामुळे सगळे आपल्याला आज मान देताहेत, आत्मीयता दाखवताहेत, हेवाही करताहेत. पण खरं प्रेम आणि खरा विश्वास आपण गमावला आहे.
कितीही पैसा मिळवला तरी प्रेम-विश्वास मिळत नाही.
देश कुठलाही झाला तरी आईचं दूध ते आईचंच ना! इथं अमेरिकेचा प्रश्न कुठं आला?
आपण ज्या घरातली मुलगी आणतो, त्या घरचे गुण त्या मुलीबरोबर आपल्या घरी येतात. म्हणतात ना, सुतासारखी साडी असते आणि आईसारखी मुलगी असते.
अगदी गरीब घरच्या मुलीला सून करुन आणू नये. गरिबाला ऐश्वर्य मिळालं की तो मध्यरात्री छत्र घेऊन फिरायला लागतो म्हणतात! अगदी खरंय ते!’
नदीपलीकडचं कुरण नेहमीच हिरवंगार दिसत असतं.