Meghdoot (Marathi)
Rate it:
Kindle Notes & Highlights
74%
Flag icon
तनु सडपातळ, दांत रेखिले, ओठ सरस जणुं पिकें तोंडलें बारिक कंबर, सखोल नाभी, भ्याल्या हरिणीसमान डोळे, पृथुलनितंबा मंदगामिनी, स्तनभारानें किंचित् लवली, स्रीरूपाची पहिली प्रतिमा काय विधीनें गमे घडविली!
75%
Flag icon
असतिल सुजले डोळे सखिचे सदैव करितां प्रदीर्घ रोदन उष्ण दीर्घ त्या निःश्वासांनीं गेले असतिल ओठहि करपुन तळहातावर वदन विसावे मुक्त केश त्यावरीं विखुरले घनपटलीं जणुं केंविलवाणें बिंब शशीचें अर्धझांकलें!
78%
Flag icon
उंबरठ्यावर फुलें मांडुनी एक एक ती दिवस मोजिते किति विरहाचे मास राहिले, पुन्हां पुन्हां अजमावुन बघते रमते केव्हां कल्पनेंत मम सहवासाचीं चित्रें रेखुन विरहामध्यें रमणी बहुधा असेंच करिती मनोविनोदन!