‘पशू लढतात ते त्यांच्या शरीराच्या रक्षणासाठी. माणसं त्यांच्या कल्पनेतल्या स्वत:चं रक्षण करण्यासाठी शाप देतात. आपण कोण आहोत आणि इतरांनी आपल्याकडे कसं बघावं याची कल्पना म्हणजे अहम्. या अहम्ला सारखी बाह्य जगाकडून मान्यता हवी असते. ती मिळाली नाही, की त्याला असुरक्षित वाटतं. अहम् माणसाला वस्तूंचा संग्रह करायला लावतो, वस्तूंच्या माध्यमातून लोक आपल्याला, आपण स्वत:ला जसे वाटतो आहोत तसे समजून, मान देतील, असं आपल्याला वाटतं. आणि म्हणूनच, जनका, माणसं त्यांची संपत्ती, त्यांचं ज्ञान आणि त्यांची शक्ती यांचं प्रदर्शन करत असतात. अहम् हा दिसून येण्यासाठी तळमळत असतो.’