‘तू त्याचा निवाडा करतो आहेस, लक्ष्मणा, पण मी त्याच्यावर प्रेम करते. तू तुझ्या भावाकडे आदर्श म्हणून पाहातोस आणि तो तुझ्या अपेक्षांना उतरला नाही, म्हणून तू रागावतोस. माझा पती जसा आहे, तसा मी पाहाते आणि त्याच्या प्रेरणा मला समजतात, प्रत्येक क्षणी तो जे सर्वोत्तम असण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादणार नाही. त्याला माझं प्रेम जाणवून देण्याची माझी ही पद्धत आहे. आणि त्याला मी दिसते, काही झालं तरी मी त्याला पाठिंबा देईन हे त्याला माहीत आहे, अगदी त्याने आतासारखा रुसलेल्या मुलासारखा वेडावाकडा मार्ग पत्करला तरीही.’