‘पण त्याने तुला त्यागलं आहे. आणि तू विवाहाच्या जोखडातून मुक्त आहेस. त्याला चिकटून राहू नकोस. माझ्याकडे ये.’ ‘तो मला बांधून ठेवतो की नाही याचा संबंध नाही. ती माझी इच्छा आहे की नाही याच्याशी संबंध आहे. आणि मला इच्छा नाही. मला गरज वाटत नाही. रामाबरोबर किंवा रामाशिवाय मी स्वतःमध्ये संपूर्ण आहे. राम माझं पूर्णत्व प्रतिबिंबित करतो आणि मी त्याचं. तू, जो अपूर्ण आहेस, त्याने केवळ मी अरण्यात एकटी आहे, म्हणून माझं अपूर्णत्व गृहीत धरू नये.’