सीतेला त्या कथा आवडत, पण तिच्या लक्षात येई, की कोणतीतरी मोजपट्टी लावून एकाला नायक आणि एकाला खलनायक केलं आहे. सर्व मोजपट्ट्या या माणसाला स्वत:बद्दल चांगलं वाटावं म्हणून, त्याच्या भ्रमातून निर्माण झालेल्या होत्या. निसर्गात कुणी बळीही नसतं आणि कुणी खलनायकही नसतं, केवळ भक्ष्य आणि भक्षक असतं, जे अन्नाच्या शोधात असतात, आणि जे अन्न बनतात.