More on this book
Community
Kindle Notes & Highlights
‘पशू लढतात ते त्यांच्या शरीराच्या रक्षणासाठी. माणसं त्यांच्या कल्पनेतल्या स्वत:चं रक्षण करण्यासाठी शाप देतात. आपण कोण आहोत आणि इतरांनी आपल्याकडे कसं बघावं याची कल्पना म्हणजे अहम्. या अहम्ला सारखी बाह्य जगाकडून मान्यता हवी असते. ती मिळाली नाही, की त्याला असुरक्षित वाटतं. अहम् माणसाला वस्तूंचा संग्रह करायला लावतो, वस्तूंच्या माध्यमातून लोक आपल्याला, आपण स्वत:ला जसे वाटतो आहोत तसे समजून, मान देतील, असं आपल्याला वाटतं. आणि म्हणूनच, जनका, माणसं त्यांची संपत्ती, त्यांचं ज्ञान आणि त्यांची शक्ती यांचं प्रदर्शन करत असतात. अहम् हा दिसून येण्यासाठी तळमळत असतो.’
मृत्यूच्या भीतीने वनस्पती पोषणाच्या मागे लागतात आणि सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या दिशेने वाढतात. मृत्यूच्या भीतीने पशू अन्नाच्या आणि भक्ष्याच्या दिशेने धावतात. त्याच वेळी जीवनाच्या आसक्तीने पशू भक्षकांपासून पळून लपून बसतात. पण मानवी भीती ही एकमेव आहे: कल्पनेने त्यात भरच घातली जाते, ती मूल्यं आणि अर्थ शोधते. ‘मी महत्वाचा आहे का? मला महत्त्व कशामुळे प्राप्त होईल?’
विचार हा देव असेल, पण अन्न ही देवी आहे. एकाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व असू शकत नाही.
‘जनकाने तिला विवाहात सौख्य शोधण्याऐवजी विवाहात सौख्य आणायला सांगितले.’
निष्ठा ही वैवाहिक जीवनात इतकी महत्त्वाची का, याचं कुतूहल मांडवीला होतं. तिने ऐकलं होतं, की राक्षस स्त्रिया स्वत:ला केवळ पतीपुरतं मर्यादित ठेवत नाहीत, आणि राक्षस पुरुषही स्वत:ला पत्नीपुरतं मर्यादित ठेवत नाहीत. निसर्गात सर्व प्रकारचे संबंध आढळ्तात: हंसपक्षी एकमेकांशी एकनिष्ठ राहातात. वानरांमधले नर माद्यांचा ताफा बाळगतात आणि असूयेने त्यांचं रक्षणही करतात, राणी माशीचे अनेक चाहते असतात. मग ऋषिंनाच एकनिष्ठता इतकी महत्त्वाची का वाटते? ‘आपल्या सहचाऱ्याने आपल्याला जे देऊ केलं आहे, त्याबद्दल आपण किती समाधानी आहोत, त्याचं हे एक द्योतक आहे. हे असमाधान मग दुसरीकडे कुठेतरी समाधान शोधतं.’ विश्वामित्र
...more
‘जेव्हा तपस्येशिवाय यज्ञ केला जातो, तेव्हा आपली भूक भागवण्यासाठी आपण इतरांच्या भुकेचं शोषण करतो. अशा रीतीने एक भ्रष्ट समाज निर्माण होतो.’
‘तात्विक ज्ञानाचे शिक्षण मनाला विकसित करते, तर प्रात्यक्षिक ज्ञान शरीराचा विकास करते. दोन्हींचे मूल्य आहे, आणि दोन्हींसाठी किंमत मोजावी लागते. अहं असतो, तो बऱ्या किंवा वाईटाची कल्पना आणतो. आत्मा सारे काही पाहातो, आणि स्मित करतो.’
ज्या समाजात अपूर्णत्वाला जागा नसते, तो समाज कधीच सुखी होऊ शकत नाही.’
समाजात, एखाद्या माणसाकडे काय आहे, यावरून त्याची किंमत ठरते. पण राम स्वत:ची किंमत त्यावरून ठरवत नाही. तो अयोध्येकडे त्याची मालमत्ता किंवा हक्क म्हणून बघत नाही. त्यामुळे तो ती सहजपणे सोडून देतो. यातून शहाणपण दिसून येते. स्वतःचे मूल्य कसे करायचे, हे ठरवण्याची क्षमता तपस्या माणसाला देते. यावरूनच तो समाजात कोणत्या प्रकारे यज्ञ करणार हे ठरते. पण या महाकाव्याच्या सुरुवातीला, ज्या तऱ्हेने राम स्वतःला अयोध्येपासून सुटे करतो, ते महान वाटते, पण महाकाव्याच्या अखेरीस, तो त्याच पद्धतीने स्वतःला पत्नीपासूनही सुटे करतो, ते भयंकर वाटते. अलिप्तपणाची काळी बाजू हे महाकाव्य समोर आणते. वाटते तितकी अलिप्तता नेहमीच
...more
होय, हा प्रसंग दुर्दैवी खराच, पण तो आपल्या जीवनातील एक प्रसंग आहे, त्याला हवं तर आपण शोकांतिका म्हणू शकतो. दोषारोपाने कुणाचेच भलं होत नाही, आपापल्या जबाबदाऱ्या घेऊ या. कारण जीवनात काहीही अचानक घडत नाही; हे आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे. हा क्षण जसा असायला हवा तसाच आहे. मी भूतकाळाचं कर्ज फेडत आहे, तसेच तुम्हीही. आपण आपल्या जीवनातील परिस्थिती बदलू शकत नाही, पण आपण आपले पर्याय निवडू शकतो.
मी माझ्या कुलाशी प्रामाणिक राहाण्याचा पर्याय स्वीकारला आहे.माझ्या पत्नीने, माझी पत्नी म्हणून तिची भूमिका निभावण्याचा पर्याय निवडला आहे. माझ्या भावाने त्याच्या भावनांशी प्रामाणिक राहाण्याचा पर्याय निवडला आहे. हे पर्याय निवडायची अनुमती आम्हाला द्या. आमचे निर्णय स्वीकारा. तुम्ही रागावला आहात ते राणीवर किंवा तिच्या पुत्रावर किंवा राजावर नाही, तर जीवन तुम्हाला वाटलं होतं तसं प्रत्यक्षात घडत नाहीये, म्हणून तुम्ही रागावला आहात. तुम्ही इतकं गृहीत धरलेलं जग एका क्षणात कोसळलं आहे. मन विशाल करा, आणि तुमच्या गृहीतकांमधून आणि अपेक्षांमधून निर्माण होणारं दुःख समजून घ्या. अशी परिस्थिती ज्यामुळे निर्माण होते,
...more
आत्ता मी मेलो, तर अयोध्येचं कसं होईल?’ तो म्हणाला. ‘काहीही नाही.’ कौसल्या खिन्नपणे म्हणाली. ‘सूर्य उगवेल. पक्षी गातील आणि नगरी आपल्या नित्याच्या व्यवहाराला लागेल. जगाला आपली गरज नाही, पतिदेव, आपल्याला जगाची गरज आहे. चला, आत जाऊया आणि भरताच्या राज्याभिषेकाची तयारी करूया. सुदैव आणि दुर्दैव येतं आणि जातं, पण जीवन चालूच असतं.’
रामाने ऋषिंना लवून नमस्कार केला आणि म्हणाला, ‘मला जे नाकारलं गेलेलं दिसत आहे, त्या राजाच्या जीवनाविषयी तुम्हाला कळकळ आहे. जे माझं असायला हवं होतं, ते जीवन माझ्यापासून हिरावून घेतला गेलेला मी तुम्हाला एक बळी वाटतो. माझ्या वडिलांच्या इच्छेपुढे मान तुकवणारा आणि तुमच्या दृष्टीने जगाकडे न पाहू शकणारा एक मूर्ख वाटतो, पण मला असं बाटतं, की गोष्टी मला जशा दिसतात, तशा इतरांना का बरं दिसत नसतील. मी स्वत:ला बळी समजत नाही. मी राजाच्या जीवनासाठी तळमळत नाही. कुठल्याही राजवैभवाशिवाय आणि अधिकाराशिवाय वनात राहावं लागणं ही मी शोकांतिका समजत नाही. मी याला एक संधी समजतो, आणि माझ्यासारखा विचार इतर लोक करू शकत
...more
‘नाही, मंथरे, तुझा दोष नाही. तू कैकेयीच्या मनातील सुप्त भीती चेतवलीस आणि तिने माझ्या वडिलांचा बेजबाबदारपणा उघडकीस आणला. भविष्यात मागून घेता येतील असे वर न देण्याची निवड त्यांना करता आली असती. ते न मागण्याची निवड तिला करता आली असती. प्रत्येकजण त्याच्या कृतीसठी उत्तरदायी आहे. मी तुला दोष देत नाही, किंवा तुला जबाबदारही धरत नाही. शांतपणे घरी परत जा.’
योग्य-अयोग्य हे माणसं ठरवतात, निसर्ग नाही.’
‘फुलं स्वत:ला सुगंधित करतात आणि मध देऊ करतात. का? मधमाशांना पोसण्यासाठी, की परागीभवन होण्यासाठी? की दोन्ही? निसर्गात, मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. दान काहीच नसतं. शोषण नसतं, स्वार्थ नसतो, की नि:स्वार्थपणाही नसतो. इतरांना वाढायला मदत करूनच कुणाचीही वाढ होते. पूर्णत्वाला पोचलेला समाज म्हणजे हाच नव्हे का?’
‘गर्भिणी हरिणीला मारणारी वाघीण तर नक्कीच खलनायक असणार.’ लक्ष्मणाने प्रतिवाद केला. ‘मग त्या वाघिणीने उपाशी राहून मेलेलं तुला चालेल का? तिच्या बछड्यांना कोण भरवेल मग? तू? निसर्गात असंच घडतं. भक्ष्य असतं आणि भक्षक असतो. पळून गेलेल्या हरणाबद्दल वाघीण वाईट वाटून घेत नाही. आपल्या बछड्याचा घास घेणाऱ्या वाघिणीला हरिणी दोष देत नाही. ते त्यांच्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे जात असतात. वनस्पती आणि प्राणी जगतात, पण माणसं बरं वाईट ठरवतात, कारण आपल्याला स्वत:बद्दल चांगलं वाटून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच आपण नायक आणि खलनायक, बळी आणि हुतात्मे यांनी भरपूर अशा कहाण्या रचतो.’ राम म्हणाला.
सीतेला त्या कथा आवडत, पण तिच्या लक्षात येई, की कोणतीतरी मोजपट्टी लावून एकाला नायक आणि एकाला खलनायक केलं आहे. सर्व मोजपट्ट्या या माणसाला स्वत:बद्दल चांगलं वाटावं म्हणून, त्याच्या भ्रमातून निर्माण झालेल्या होत्या. निसर्गात कुणी बळीही नसतं आणि कुणी खलनायकही नसतं, केवळ भक्ष्य आणि भक्षक असतं, जे अन्नाच्या शोधात असतात, आणि जे अन्न बनतात.
राम म्हणाला, ‘घटना या घटना असतात. माणसं त्याला चांगलं किंवा वाईट म्हणतात.’
राम म्हणाला, ‘सगळ्याच गोष्टी या मागे वळून बघितल्यानंतरच चांगल्या किंवा वाईट वाटतात.’
अधीरता हा शहाणपणाचा शत्रू आहे,
‘ज्ञान हे केवळ तरंगत्या ओंडक्यासारखं असतं, जे आपल्याला दु:खाच्या सागरात तरंगत राहायला मदत करतं. किनारा गाठण्यासाठी आपल्यालाच हातपाय मारून पोहावं लागतं. ते काम आपल्यासाठी कुणीच करू शकत नाही.’ हनुमान म्हणाला.
भीती जसं देवांचं अस्तित्व कुरतडत राहाते, तशी भूक दानवांचं अस्तित्व कुरतडत राहाते. या युद्धाला अंत नाही, विजयानंतर पराभव अटळ आहे,
मी माझ्या विश्वाचा निर्माता आहे, आणि तसाच तूही. अपेक्षांचं जाळं तोडलं, तर आपल्या विश्वांच्या कक्षा रुंदावू शकतो. अपेक्षांमध्ये स्वत:ला गुरफटून घेतलं तर आपली विश्वे आपण संकुचित करू शकतो.’
‘ती ऐकतच नाही.’ राम फटकन म्हणाला. ‘मी जेव्हा तिला राजवाड्यात राहायला सांगितलं, तेव्हा तिने माझ्याबरोबर अरण्यात येण्याचा आग्रह धरला. जेव्हा तू तिला अरण्यात कुटीच्या आत राहायला बजावलेस, तेव्हा ती हट्टाने बाहेर आली. रावणाला मारल्यावर जेव्हा मी उद्धटपणे तिला विवाहबंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला, तिव्हा तिने अग्निपरीक्षा देऊन, पावित्र्याचे प्रदर्शन करत माझ्याबरोबर परत नगरीत येण्याचा आग्रह धरला. जर मी तिला सांगितलं की ती अफवांचं कारण आहे, आणि म्हणून ती माझ्याबरोबर राहू शकत नाही, तर ती मला इतके गुंतागुंतीचे प्रश्न विचारेल, की मी त्यांची उत्तरं देऊ शकणार नाही. हे असंच बरोबर आहे. तिला समजेल. तिला
...more
‘तू त्याचा निवाडा करतो आहेस, लक्ष्मणा, पण मी त्याच्यावर प्रेम करते. तू तुझ्या भावाकडे आदर्श म्हणून पाहातोस आणि तो तुझ्या अपेक्षांना उतरला नाही, म्हणून तू रागावतोस. माझा पती जसा आहे, तसा मी पाहाते आणि त्याच्या प्रेरणा मला समजतात, प्रत्येक क्षणी तो जे सर्वोत्तम असण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादणार नाही. त्याला माझं प्रेम जाणवून देण्याची माझी ही पद्धत आहे. आणि त्याला मी दिसते, काही झालं तरी मी त्याला पाठिंबा देईन हे त्याला माहीत आहे, अगदी त्याने आतासारखा रुसलेल्या मुलासारखा वेडावाकडा मार्ग पत्करला तरीही.’
‘शूर्पणखा, तू त्यांच्यावर जितकं प्रेम करतेस, तितकं त्यांनी तुझ्यावर करावं अशी अपेक्षा तुझ्या भोवतालच्या लोकांकडून तू किती काळ करणार? दुसरा तुझ्यावर प्रेम करत नसला, तरी त्याच्यावर प्रेम करण्याची आंतरिक शक्ती मिळव. इतरांना निरपेक्षपणे खाऊ घालून तुझ्या भुकेच्या वर उठ.’ ‘पण मला न्याय हवा आहे.’ शूर्पणखा म्हणाली. ‘किती शिक्षा पुरेशी होईल? दशरथाच्या पुत्रांनी तुला विद्रूप केल्यापासून त्यांना शांती नाही. तरीही तू सतत संतापलेली आणि दुखावलेली आहेस. न्यायाने मानवांचं कधीच समाधान होत नाही. पशू कधीच न्याय मागत नाहीत.’
‘तुझ्या बळी अवस्थेत तू स्वतःच अडकते आहेस. मग रावणासारखी हो. तुझे भाऊ मेले, पुत्र मेले आणि तुझं राज्य जळालं तरी राजेपणाच्या कल्पनेत ताठ उभी राहा. तुझ्याशिवाय कुणाचा पराभव होणार? संस्कृती येतात आणि जातात. राम आणि रावण येतात आणि जातात. प्रकृती शाश्वत असते. मी तर प्रकृतीचाच आनंद घेईन.’
‘जीवनाबद्दल समाधानी असणं हा केवळ एक पर्याय आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अधिकही मागू शकता. तेही मानवतेचं एक लक्षणच आहे.’
‘वनस्पती सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात आणि प्राणी जोडीदारासाठी. मानवतेचा आशीर्वाद लाभल्याने फक्त तुम्ही आणि मीच स्पर्धा सोडून देऊ शकतो. ते करणं हाच धर्म आहे.’
‘पण त्याने तुला त्यागलं आहे. आणि तू विवाहाच्या जोखडातून मुक्त आहेस. त्याला चिकटून राहू नकोस. माझ्याकडे ये.’ ‘तो मला बांधून ठेवतो की नाही याचा संबंध नाही. ती माझी इच्छा आहे की नाही याच्याशी संबंध आहे. आणि मला इच्छा नाही. मला गरज वाटत नाही. रामाबरोबर किंवा रामाशिवाय मी स्वतःमध्ये संपूर्ण आहे. राम माझं पूर्णत्व प्रतिबिंबित करतो आणि मी त्याचं. तू, जो अपूर्ण आहेस, त्याने केवळ मी अरण्यात एकटी आहे, म्हणून माझं अपूर्णत्व गृहीत धरू नये.’
जेव्हा आपण स्वप्नासाठी वास्तव नाकारतो, तेव्हाच दुःख होतं.’
‘भीती ही नित्य आहे आणि श्रद्धा ही निवड आहे. भीती कर्मातून निर्माण होते, श्रद्धेतून धर्म निर्माण होतो. भीती ही कैकेयी आणि रावण, कुचाळक्यांनी भरलेले रस्ते, कठोर नियम आणि नाजुक कीर्ती असलेली कुटुंबे निर्माण करते. ते कायमच राहाणार आहेत. श्रद्धा ही सीता आणि राम निर्माण करते. जगाने आपला त्याग केला तरी आपण जगाचा त्याग करणार नाही एवढं आपलं मन विस्तारण्याएवढी जर आपली श्रद्धा असेल, तरच ते अस्तित्वात येतात.’