More on this book
Kindle Notes & Highlights
जगणं म्हणजे झोपाळ्यावर बसून झोके घेणं नव्हे. जीवन हे वादळातून होडी हाकारण्यासारखं आहे!’’
पहिलं प्रेम हे आयुष्यातलं एक वादळ आहे. वादळात सापडलेला मनुष्य... अगदी जवळ असलेल्या मनुष्याच्या गळ्यात पडतो ना? पहिल्या प्रेमातही तसंच होतं!’’
प्रेम काय स्पर्शानंच व्यक्त होतं? ते साध्या कटाक्षांतून सुद्धा व्यक्त होऊ शकतं!
वादळात दोन होड्यांची योगायोगानं गाठ पडावी, तशी माणसाच्या पहिल्या प्रेमाची स्थिती असते! वादळ संपलं की, त्या होड्या आपआपल्या निवाऱ्याच्या जागी जातात. कित्येकदा त्या जागा एकमेकांपासून फार फार दूर असतात! त्याला कोण काय करणार?’’
माझे एक मन म्हणाले, आपण कुणाशी लग्न करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रीती ही विजेसारखी आहे. तिची चमकण्याची जागा कोण निश्चित करणार?
एखाद्या लहान मुलाला कितीही खेळणी दिली, तरी जोपर्यंत खेळायला दुसरा जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत त्याला त्या खेळण्यांची गंमत वाटत नाही. कॉलेजातल्या मुलांमुलांचेही तसेच होते. पण खेळातला जोडीदार आयुष्यातला जोडीदार होर्इलच, म्हणून कुणी सांगावे? क्रिकेटच्या टीममध्ये एखाद्या महाराजापासून कारकुनापर्यंत निरनिराळ्या दर्जांचे खेळाडू असतात ना? खेळ खेळताना ते अगदी खेळीमेळीने वागतात. पण तेवढ्यामुळे काही ते आयुष्यात एकमेकांचे जिवलग मित्र होत नाहीत. कॉलेजच्या आयुष्यक्रमात आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते पुष्कळदा अशा प्रकारचे असते. बाहेरच्या सृष्टीत सुरवंटाची फुलपाखरे होतात; पण मनुष्याच्या मनातल्या फुलपाखरांचे
...more
दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करायची जी विलक्षण तळमळ लागते, तिचे नाव प्रीती!’’
वादळात ज्या होड्या एकमेकींच्या जवळ येतात, मृत्यूच्या दारात ज्या होड्यांना एकमेकींचा आधार मिळतो, त्याच आयुष्यभर एकत्र प्रवास करतात.
मनुष्य ज्याच्या आधारावर जगतो, प्रसंगी ज्याच्यासाठी आनंदाने मरायलाही तयार होतो, ते प्रेम नुसते स्वप्नाळू असून चालत नाही.
जगात प्रत्येक मनुष्य तत्त्वज्ञान सांगत असतो. पण ते सांगताना त्याचा हेतू सत्य शोधण्याचा नसतो; उलट, सत्य लपविण्याचा असतो. माणसाचे तत्त्वज्ञान म्हणजे त्याने स्वत:च्या दुबळेपणावर घातलेले पांघरूण!
मनुष्य अनुभव विसरला, तरी आपली स्वप्ने विसरत नाही.
प्रेम म्हणजे दुसऱ्यासाठी जगण्याची इच्छा, आपल्या माणसाला सुखी करण्याचे वेड!
‘सुखाचा संसार म्हणजे मोठ्या वादळातून पैलतीराला लागलेली होडी.’
भक्ती म्हणजे दुसऱ्यासाठी स्वत:ला विसरण्याची शक्ती! ज्याला स्वत:च्या सुखाची कल्पना विसरता येत नाही, मोठेपणाची कल्पना विसरता येत नाही, दुसऱ्याच्या हृदयाची पूजा करता येत नाही, त्याच्या प्रेमाला भक्तीचं स्वरूप कधीच प्राप्त होत नाही. आकर्षणाचा आत्मा उपभोग हा आहे. उलट, भक्तीचा आत्मा त्याग आहे!’’
अकारण वाढवलेली आशा ही निराशेपेक्षाही असह्या होण्याचा संभव असतो.
पहिले प्रेम हे एक विचित्र अर्धसत्य आहे आणि अर्धसत्ये ही दर्शनी मोहक पण परिणामी दाहक असतात, हा अनुभव जगात कुणाला आलेला नाही?
पायातला काटा काढून टाकला, तरी तिथे काही तरी बोचतंय, असे माणसाला वाटत राहतेच ना? हृदयातल्या शल्याच्या बाबतीतही त्याला हाच अनुभव येतो.
तळ्यात कितीही पाणी असलं, तरी ते साठवलेलं असतं. नदीच्या वाहत्या पाण्याची – मग ते गुडघाभर का असेना – याला सर यायची नाही. माणसाचं आयुष्य ही नदी आहे; तळं नाही.
अंधारात मनुष्याला नुसती आकाशातली रहस्येच दिसतात, असे नाही! मनुष्याच्या मनातली रहस्येही त्याला याच वेळी कळतात.
‘मुनष्य जगण्याकरता जन्माला आलेला आहे; मरण्याकरिता नाही.’