आणखी एक विशेष सूचना : तुमची नीट ओळख नसलेल्या व्यक्तीशी बोलताना श्री., श्रीमती, सौ., साहेब अशी बिरुदं आवर्जून लावा. ऑफिसमधल्या चपराशालासुद्धा अमुक साहेब, असं म्हटलेलं जास्त आवडत असतं. तसंच तुमच्या कनिष्ठ सहाय्यकाचंही असतं आणि प्रत्येक पातळीवरच्या लोकांचंही असतं.