ई. प्रेमात अपयश यायला लागेल, तेव्हा भव्य विचार करा नकारात्मक, खुजेपणाची आणि ‘तो (किंवा ती) माझ्याशी अन्याय्य वागल्यामुळे मी या गोष्टीचा बदला घेईन’ अशा प्रकारची विचारपद्धती प्रेमाचा गळा घोटणारी आणि तुम्हाला मिळू शकणारी आपुलकी, नष्ट करणारी असते. प्रेम वा प्रणयाच्या बाबतीत मामला बिघडायला लागला, तर: १. तुम्हाला ज्या व्यक्तीचं प्रेम हवं आहे, त्या व्यक्तीच्या सगळ्यात मोठ्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. लहान-सहान गोष्टी त्यांच्या योग्य जागी, म्हणजेच, दुय्यम स्थानी ठेवा. २. तुमच्या जोडीदारासाठी विशेष काहीतरी करा. आणि सारखं करतच राहा.