मोठाल्या बाता मारणं, दिखाऊ बोलणं आणि वाद-विवाद काहीवेळा आवश्यक असतात. ह्या गोष्टी विधायक असतील, तर त्या उपयोगी ठरतात. फालतू गप्पा मारण्याकडे तुमचा कल आहे का, हे तपासून बघण्यासाठी खालील चाचणी करून पाहा. १. मी इतर लोकांबद्दल कंड्या पिकवतो का? २. इतरांबद्दल मी नेहमी चांगलंच बोलतो का? ३. एखाद्या भानगडीविषयी ऐकायला मला आवडतं का? ४. इतरांबद्दल मत बनवताना मी सत्याचा आधार घेतो का? ५. अफवा घेऊन माझ्याकडे येण्यासाठी मी इतरांना प्रोत्साहन देतो का?