शोडासा पुढाकार घेण्यानं मित्र कसे जोडता येतात, याचे हे सहा मार्ग बघा : १. संधी मिळताच, इतरांना स्वतःचा परिचय करून द्या. पार्ट्या, बैठकी, प्रवासात, ऑफिसमध्ये असं कुठेही आपला परिचय करून देण्याची संधी सोडू नका. २. समोरच्या व्यक्तीला तुमचं नाव नीट ऐकू येईल, याची काळजी घ्या. ३. समोरची व्यक्ती स्वतःचं नाव ज्या पद्धतीनं उच्चारते, त्याच पद्धतीनं तुम्हीही ते उच्चारता की नाही, याची खात्री करून घ्या. ४. समोरच्या व्यक्तीचं नाव लिहून घ्या आणि ते योग्यप्रकारे लिहिलेलं असल्याची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्या. आपलं नाव अचूकपणे लिहिलं जावं यावर लोकांचा कटाक्ष असतो. शक्य असेल तर त्या व्यक्तीचा पत्ता आणि फोन
...more