ड. माझ्या सामाजिक गटाबद्दल माझे विचार प्रगतिशील आहेत का? १. माझ्या सामाजिक गटात (राहती सोसायटी, शाळा, मंडळ इ.) ज्यामुळे काहीएक सुधारणा झाली आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं, असं काहीतरी मी गेल्या सहा महिन्यांत केलं आहे का? २. माझ्या सामाजिक गटाशी संबंधित चांगल्या प्रकल्पांना मी उत्तेजन देतो, त्यांना विरोध करतो, त्यांच्यावर टीका करतो की त्याबद्दल तक्रारीचा सूर लावतो? ३. माझ्या समाजगटात काही चांगल्या सुधारणा घडवून आणण्यामध्ये मी कधी पुढाकार घेतला आहे का? ४. माझे शेजारी किंवा इतर लोकांबद्दल मी चांगलै बोलतो का?