२. अधिक जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी अधिक काम कसं करू शकेन? यावर लक्ष केंद्रित करा. त्यानं तुम्हाला तुमच्या सध्याच्या कामाचं अधिक चांगलं आणि नेटकं नियोजन व पुनर्रचना करणं, तुमच्या दैनंदिन कामकाजाला लागणाऱ्या वेळ व श्रमात हुशारीनं काटछाट करणं, अनावश्यक गोष्टींना फाटा देणं, यासारखी सृजनात्मक उत्तरं मिळतील.