वेळ येताच तुमच्या हाताखालच्या लोकांची वैय्यक्तिक प्रशंसा करा. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं कौतुक करा. जेव्हा जेव्हा ते जास्त काम करतील, तेव्हा तेव्हा त्यांची प्रशंसा करा. प्रशंसा ही तुम्ही लोकांना देऊ शकत असलेली एक महान प्रेरक गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठलीच तोशीस लागत नाही. शिवाय, तुमच्या हाताखालचे लोक कधीतरी अपेक्षा नसताना तुमच्या बचावासाठी, सहाय्यासाठी धावत येऊन तुमच्यावर उपकार करू शकतात.