‘क’ ला ती छोटी केबिन मिळाली. या गोष्टीमुळे ‘क’चा अभिमान दुखावला. तेवढ्यावरून आपल्याबाबतीत भेदभाव केला गेला असल्याचं त्याला वाटायला लागलं. नकारात्मक विचार, नापसंती, कडवटपणा, मत्सर या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याच्यात वाढत गेल्या. आपण कमी पडतो आहोत असं त्याला वाटायला लागलं, या सगळ्याचा परिणाम म्हणजे, ‘क’ त्याच्याबरोबरच्या इतर अधिकाऱ्यांशी शत्रुत्वानं वागायला लागला. त्यांच्याशी सहकार्य करण्याऐवजी तो त्यांच्या पूर्णपणे विरोधात जायला लागला.

