तुम्ही हजर असलेल्या प्रत्येक व्यावसायिक परिषद, समिती बैठक आणि सामाजिक व्यासपीठावर उत्स्फूर्तपणे काहीतरी बोला. याला अपवाद करू नका. एखादा शेरा मारा, एखादी सूचना मांडा, एखादा प्रश्न विचारा. आणि हो, सगळ्यांत शेवटी बोलू नका. बोलणारा पहिला माणूस ठरण्याचा प्रयत्न करा.

