प्रथम मी त्यांच्याशी खाजगीत बोलतो. दुसरं म्हणजे, जी गोष्ट ते चांगली करतात, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. तिसरं, याक्षणी जी एक गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीनं करणं त्यांना शक्य आहे, ती त्यांच्या लक्षात आणून देतो आणि सुधारणेचा मार्ग शोधण्यात मी त्यांना मदत करतो. चौथं त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टीचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो.