१. ‘सकर्मी’ बना. काहीतरी करणारा मनुष्य व्हा. ‘करा-रे’ व्हा ‘नको-रे-बाबा’ नका होऊ. २. परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसू नका. भविष्यातल्या अडचणी आणि अडथळे गृहीत धरा, आणि ते समोर आल्यावर त्यांचं निराकरण करा. ३. फक्त कल्पना सुचल्यामुळे यश मिळत नसतं, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जेव्हा त्यांच्याबाबतीत काही कृती करता, तेव्हाच कल्पनांना किंमत प्राप्त होत असते. ४. भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी कृतीचा वापर करा. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट सरळ करायला सुरुवात करा, तुमची भीती नाहीशी होईल. या तत्त्वाचा प्रयोग करून पाहा. ५. तुमच्या मनाचं इंजिन आपोआप सुरू होण्याची व्यवस्था
...more