Kindle Notes & Highlights
मागून पश्चात्ताप करून उपयोग नसतो; वेळीच जपावे, असे ती शिकली. मात्र गोड बोलावे, सहानुभूती दाखवावी, क्षमा करावी, स्वतःच्या सुखदुःखांना फाजील महत्व न देता दुस-यांची सुखदुःखे आधी पहावी. त्यांच्या भावना ओळखाव्या, त्यांच्या जीवनात शिरावे, सर्वांना शक्य तो आशा, आनंद, प्रेम याचा ओलावा द्यावा, वेळीच द्यावा.