ते ऐकून राजे बेचैन झाले. प्रांताचे अखत्यारी म्हणून हरजींना समजावणी देत म्हणाले, ‘‘मनाच्या गैरमेळानं काय-काय सोसावं लागतं, ते भोगलंय आम्ही राजे. माणसांची मनं तुटली की, आपुलकीचा देठच खुंटतो. कार्यी लावायची ती मोठी कामे बगलेलाच पडतात, नको तिथं माणसाचं बळ खर्ची पडतं. तुम्ही जाणते आहात. समर्थांनी आम्हास कधी काळी लिहिला तो बोध तुमच्या कानी फक्त घालून ठेवतो. तुम्ही जाणा काय जाणायचे ते त्यातून.’’