अरे, खाल्लंच आमचं गोश्त कुत्र्यांनी तर त्यांची औलादही निपजेल इमानदार! सांग तुझ्या मगरूर मालिकला खान – जी भावांची केलीस, जन्म दिल्या बापाची केलीस, हयातभर इमानी चाकरी केलेल्या मिर्झा राजाची, दिलेरची केलीस; त्याहून काय करणार दुसरी हालत तू आमची? तैय्यार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी या क्षणाला!! ध्यानी ठेव म्हणावं त्याला – आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूख त्याच्या घशात इदल, कुत्बशाहीसारखा! इथला उंबरा अन् उंबरा करील पैदा लहानथोर सेवा-संबा!!!”