More on this book
Kindle Notes & Highlights
सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या साती राण्यांनी प्रभातस्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले.
स्वत:साठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळींसाठी गुणपारखी असा तो राजा होता.
‘औरंग ’ म्हणजे ‘सिंहासन’! ‘जेब’ म्हणजे त्याची ‘शोभा वाढविणारा’ हेच खरं!!
रजपूत म्हणजे राजाचे पुत्र! राजाचे फर्जंद! राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब झाली! आता ‘रजपूत’ ‘राजबंदे’ झाले. नमकहिलाल चाकर झाले! तुम्ही रजपूत आहात, आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजाही रजपूतच आहे!’’
‘आयुष्यात हारजितीला काही मोल नसते! मोल असते, ते झगडण्याला! निकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला!!’
मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही, हेच खरे!
काही चांगले हाताशी लागेपर्यंत, हातात असलेले कमी चांगले न सोडणे, हे राजकारणात शहाणपणाचे ठरते!
जगी जे-जे प्रिय आहे, त्याला एक ना एक दिवस पाठ दाखवावीच लागते.’’
जग पूर्वेला सूर्याेदय पाहते, आम्ही पश्चिमेला पाहू!’’
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।”
दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही, सरलष्कर. दोष त्या क्षणाचा आहे, ज्या क्षणी या वणव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात! आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकमत चालत नाही.” राजांच्या ओठांतून सुटलेले बोल ऐकून संभाजीराजांना भरून आले.
आम्हास तुमचं बळ पाहिजे – वाघ पाडणारं नव्हे – वाघ होऊन चालणारं!!’’
देवस्मरण केलेल्या वेदसंपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाक्गंगा स्रवू लागली – ‘‘पुरुषोत्तम शिवाजीराजे, हम काशीक्षेत्रसे यहाँ दक्षिणदेश आये – मनमें एक धर्मसंकल्प लेकर। आपका यह किला हमने देखा, परमसंतोष। यहाँ सब है। परंतु एक नहीं। सिंहासन। नरेश, राजदंडके व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है। समस्त आर्यावर्तमें आज हिंदुओंका एक भी राजपीठ नहीं। सिंहासन नहीं, जिसे देखकर हिंदुमस्तक गर्व करे। जीवनसंग्राम लडानेकी मनीषा करे। वहीं कारन है कि, हिंदू स्वयं को निराश्रित, पराजित मान रहै है। नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म-धर्म नहीं रहता!....
गनिमाच्या घरट्याच्या उंबऱ्यावर नंगे हत्यार धरल्याखेरीज आपले घरटे सुक्षेम राहावे, ते होत नाही.
‘वडिली जोडून दिली दौलत कोण पुरुषार्थाची?
‘अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं!”’
‘‘ज्यांनी पायाच्या अंगठ्यानं मारलेली गाठ भल्या भल्यांना हातानंही कधी उकलायची नाही, त्या या सुरनिसांच्या नादी कसे लागलात पंत?’’
अखंड सावधान असावे। दुश्चित्त कदापि नसावे। तजवीजा करीत बैसावे। एकांत स्थळी।। काही उग्रस्थिती सांडावी। काही सौम्यता धरावी। चिंता लागावी पराची। अंतर्यामी।। मागील अपराध क्षमावे। कारभारी हाती धरावे। सुखी करूनी धाडावे। कामावरी।।’’
पाटांतील तुंब निघेना।। तरी मग पाणीच चालेना। तैसे जनांच्या मना। कळले पाहिजे।। जनांचा प्रवाहो चालिला। म्हणिजे कार्यभाग आटोपला। जन ठाई ठाई तुंबला। म्हणिजे खोटे।। श्रेष्ठी जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले। तरी मग जाणावे फावले। गनिमासी।। ऐसे सहसा करू नये। दोघा भांडण तिसऱ्या जय। धीर धरूनी महत्कार्य। समजोन करावे।।
राजी राखता जग। मग कार्याची लगबग। ऐसे जाणोनि सांग। समाधाने करावी।। आरंभीच पडिली धास्ती। म्हणिजे कार्यभाग होय नास्ती। याकारणे समस्ती। बुधी शोधावी।। सकळ लोक एक करावे। गनिमा लाटून काढावे। येणे करिते कीर्ती धावे। दिगंतरी।। आधी गाजवावे तडाखे। तरी मग भूमंडळां धाके। ऐसे न होता धके। राज्यासी होती।। समय प्रसंग ओळखावा। राग निपटून सांडावा। आला तरी कळो न दावा। जनांमध्ये।। राज्यामध्ये सकळ लोक। सलगी देऊनी करावे एक। लोकांच्या मनामध्ये धाक। उपजो चि नये।। बहुत लोक मेळवावे। एक विचारे भरावे। कष्ट करूनि घसरावे। म्लेंछावरी।।
वारंवार साकळून येणारा संशय महाराज निकराने परतविण्याचा प्रयत्न करीत होते. फार कठीण जात होते ते. संशयाला येण्याची वाट माहीत असते, जाण्याची दाखवावी लागते. एकतर त्याला शरण जावे लागते, नाहीतर मुळावर त्याला निपटूनच काढावे लागते. तडजोड, सुलूख नाही करता येत त्याच्याशी. त्याला शरण जाण्यात माणूसपणच हरवून बसण्याचा धोका असतो आणि त्याला निपटून काढण्यास लागतो बळकट पुरावा.
पेरते हात कितीही पुण्यवान असले, तरी बियाणेच गणंग लागावे त्यास काय?’
फिरंगी गावं लुटत नाहीत नुसती स्वामी! किरिस्ताव व्हायला राजी नसलेल्या उभ्या गावची माणसं चूड पेटवून जाळतात भर चौकात! घरचा कर्ता माणूस मेला, तर डोंबाच्या वृत्तीनं सरकारजमा करतात त्याची सारी मालमत्ता. आडा-विहिरीत पावाचे उष्टे तुकडे टाकून, ते पाणी पिताच धर्म बुडला, अशी भूमिका उठवतात. तरण्याताठ्या पोरी बाटवून भिक्षुणी म्हणून नेतात आपल्या देवळात. पांढरे झगे चढवून धर्माच्या प्रसारासाठी भरीस घालतात त्यांना दिवसभर आणि रात्री...’’ येसाजींनी मानच खाली टाकली. त्यांच्या पापण्या दहिवरल्या. उपरण्याची मूठ चाळवता-चाळवता गपकन थांबली.
ते ऐकून राजे बेचैन झाले. प्रांताचे अखत्यारी म्हणून हरजींना समजावणी देत म्हणाले, ‘‘मनाच्या गैरमेळानं काय-काय सोसावं लागतं, ते भोगलंय आम्ही राजे. माणसांची मनं तुटली की, आपुलकीचा देठच खुंटतो. कार्यी लावायची ती मोठी कामे बगलेलाच पडतात, नको तिथं माणसाचं बळ खर्ची पडतं. तुम्ही जाणते आहात. समर्थांनी आम्हास कधी काळी लिहिला तो बोध तुमच्या कानी फक्त घालून ठेवतो. तुम्ही जाणा काय जाणायचे ते त्यातून.’’
राजन हो तुम साँचे खूब लडे तुम जंग! तुव तप तेज निहारके तखत त्यजत औरंग!!”
अरे, खाल्लंच आमचं गोश्त कुत्र्यांनी तर त्यांची औलादही निपजेल इमानदार! सांग तुझ्या मगरूर मालिकला खान – जी भावांची केलीस, जन्म दिल्या बापाची केलीस, हयातभर इमानी चाकरी केलेल्या मिर्झा राजाची, दिलेरची केलीस; त्याहून काय करणार दुसरी हालत तू आमची? तैय्यार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी या क्षणाला!! ध्यानी ठेव म्हणावं त्याला – आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूख त्याच्या घशात इदल, कुत्बशाहीसारखा! इथला उंबरा अन् उंबरा करील पैदा लहानथोर सेवा-संबा!!!”