‘पूज्य भरतश्रेष्ठा! आपल्या अभयामुळं मी निश्चिंत झालेय्. द्यायचाच असेल, तर एक वर द्या. धर्माचं अनुर्वतन करणारे माझे सर्व पती अ-दास होवोत. माझी मुलं दास्यातून मुक्त होवोत.’ सारी सभा त्या वराने चकित झाली. धृतराष्ट्र म्हणाला, ‘तसंच होवो! हे भद्रे, तू योग्य तोच वर मागितलास. मी प्रसन्न आहे. आणखी वर माग. तू एका वराला योग्य नाहीस, म्हणूनच मी तुला दुसरा वर मागण्यास सांगत आहे.’ ‘पाची पंडुपुत्र आपापले रथ, शस्त्रं यांसह कौरवांच्या दास्यातून मुक्त होवोत.’ ‘तथास्तु! पण, याज्ञसेने, वर मागून घेताना संकोच कसला करतेस? तुमचं राज्य, ऐश्वर्य सारं मागून घे. मी तुला आनंदानं ते देईन. त्यासाठी मी तुला तिसरा वर देत
...more