‘शकुनिमहाराज, आज आपल्या द्यूतनैपुण्यानं आपण पांडवांना जिंकलं. द्यूतामध्ये आपला अतिदेवी म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करून द्यूत खेळणारा अन् कृतहस्त म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे फासे टाकण्यात निपुण असा आपला लौकिक आजच्या द्यूतपटावर आपण सिद्ध केला. आपण बोलून-चालून कृतहस्त. त्यापुढं पांडवांचं राज्य अन् ऐश्वर्य आटून गेलं... अन् अतिदेवी लौकिक सिद्ध करण्यासाठीच की काय, आपण त्या द्यूतप्रिय युधिष्ठिराला द्रौपदी पणास लावण्यासाठी उद्यूक्त केलंत; पण द्यूत हा मनोरंजनासाठीच व्हावा. भंजनासाठी, आत्मघातासाठी नव्हे. आपण व्यापारात निष्णात, अशीही आपली ख्याती आहे. या जगात जरीबासनांचा, तलम वस्त्रांचा, नेत्रदीपक रत्नांचा
...more