मी कुणालाच नकोय् तसं पाहिलं, तर मला कुठंच जागा नाही. नदीप्रवाहावर सोडलेल्या या तुझ्या मुलाचा प्रवास असाच चालू राहील. एक ना एक दिवस सारे प्रवाह त्या अथांग सागराला मिळतात, असं मी ऐकतो. केव्हातरी तो सागर आपल्यात मला सामावून घेईल. हा माझा अधांतरी प्रवास कुठंतरी काठावर मध्येच थांबू नये. तो सागरापर्यंत सरळ जावा, एवढाच आशीर्वाद तू दे.’