‘युवराज, आपण म्हणता, ते सत्य आहे; पण त्याचबरोबर एका कुलात दोन राजसूय होत नसतात. जोपर्यंत आपण युधिष्ठिराला जिंकलं नाही, तोवर आपणांस राजसूयाचा अधिकार नाही. काही कारणानं कधी युधिष्ठिराचा पराभव झालाच, तर राजसूयाचा अधिकार लाभेल.’ ‘युवराजांना यज्ञच करता येणार नाही?’ कर्णाने विचारले. ‘तसं नाही. युवराज, राजसूयाशी स्पर्धा करणारा वैष्णवयज्ञ तुम्ही करा. त्यायोगे विपुल कीर्ती तुम्हांला मिळेल. तुम्हांला करभार देणारे भूपाल आहेत. ते तुम्हांला घडविलेलं व खाणीतून काढलेलं सुवर्ण देतील. त्या सोन्याचा नांगर करून त्यानं यज्ञभूमी नांगरून द्या आणि राजसूयाइतकंच श्रेष्ठ असं हे सत्र निर्विघ्नपणे पार पाडा!’ पुरोहितांनी
...more