‘ती माझी योग्यता असेलही; पण, वृषाली, नुसत्या योद्धयाच्या कौशल्यावर युद्ध जिंकलं जात नाही. सारथ्याला तेवढंच बळ असावं लागतं. दुबळ्यांनाही वज्रबळ मिळवून देणारा सारथी तो कृष्ण कुठं अन् आपल्या निंदेनं सूर्यालाही झाकळू पाहणारा शल्य कुठं! वृषाली, मी उद्या नसलो, तरी चालेल. माझ्यामागं मला जाणून घेणारं कुणी भेटेल, असं वाटत नाही. मला संपूर्ण समजून घेणारी तू....तू तरी मागं राहशील, त्याचा आनंद मला आहे.’