कृष्ण द्रौपदीसह जाताना पाहून दुर्योधन सावध झाला. महाकष्टाने आखलेला डाव कृष्णाच्या येण्याने पुरा उधळला गेला होता. दुर्योधन संतापाने उभा राहिला. त्याचवेळी कृष्णाने मागे वळून पाहिले. ती दाहक दृष्टी पाहताच दुर्योधन नकळत उठला, तसा परत आसनावर बसला. त्याची दृष्टी परत जेव्हा सभागृहाच्या द्वाराकडे गेली, तेव्हा तेथे कृष्ण व द्रौपदी नव्हती. राजद्वार मोकळे होते.