मृत्यु म्हणजे सर्वनाश नव्हे मृत्यु म्हणजे रुपांतर. ग्रीष्मकाली सूर्यकिरणांत हिमालयाचे हिमखंड वितळतात, म्हणजे का त्या बर्फाच नाश झाला म्हणायचं? मग गंगेचा पूर. ते रूप कोणतं? तीच गंगा सागराला मिळते म्हणजे का ती नाहीशी होते? ते सागररूप तिचंच नव रूप नाही का? या रूपांतराचं भय वाटतं म्हणूनच मृत्युचं त्या विचाराने कर्णाची मान ताठ झाली. एक निराळाच विश्वास त्याच्या मनात प्रगटला. रूपांतराचं भय! परिचितातून अपरिचितात जायता एवढी भीती वाटते? प्रत्येक क्षणाला रूपांतरातून जाणाऱ्या मानवाला अंतिम रुपांतराची भीती का वाटावी? आश्चर्य आहे जीवनातलं बाल्य केव्हा सरलं, तारुण्यानं, जीवनात केव्हा पदार्पण केलं,
...more